टीम महाराष्ट्र देशा:-आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळी राजकीय पक्षात प्रवेश करीत आहेत. भाजपमध्ये मेगाभरती सुरु असून त्यापाठोपाठ सेनेत प्रवेश करण्यासाठी देखील अनेकजण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.याच पार्श्वभूमीवर बॉलीवूड अभिनेता संजय दत्त हा राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.मात्र आता संजय दत्तने त्याच्या राजकारणातील प्रवेशावर सुरू असलेल्या विविध चर्चांना विराम दिला आहे.
यावर माध्यमांनी संजूबाबाला विचारले असता, संजय म्हणाला की, मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाहीये. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर माझे चांगले मित्र आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत असे संजय दत्त याने म्हंटले आहे.
दरम्यान रविवारी मुंबईत रासपच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर साजरा करण्यात आला. यावेळी प्रचंड शक्तिप्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची देखील उपस्थिती होती. या मेळाव्याला संबोधित करताना जानकर यांनी संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केल होत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

