टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अजून एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हे भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत धनंजय महाडिक भाजप प्रवेश करणार असल्याचं सांगितल जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑगस्टला महाजनादेश यात्रे निमित्त महाराष्ट्रात येणार आहेत. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत धनंजय महाडिक भाजपात प्रवेश करणार असल्याची आम्हिती सूत्रांनी दिली आहे. सध्या धनंजय महाडिक हे मुंबईमध्ये आहेत. तर भाजप नेत्यांशी चर्चा करत आहेत. तर महाडिक यांच्या भाजप प्रवेशाची तारीख उद्या निश्चित होणार आहे.
धनंजय महाडिक यांना कोल्हापूरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीसह काँग्रेसमधीलही स्थानिक नेत्यांचा विरोध होता. तरी देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली होती. मात्र हा विश्वास फोल ठरला आणि धनंजय महाडिक यांना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासमोर लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला.
- धनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का? : बाळराजे पाटील
- राष्ट्रवादीला धक्यावर धक्का ; उल्हासनगरच्या आमदार ज्योती कालानीही भाजपच्या वाटेवर?
- मुख्यमंत्री बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास का घाबरतात ? : जयंत पाटील
- राज्यात पुन्हा युतीचचं सरकार येणार : फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
