Share

कॉंग्रेसला प.महाराष्ट्रात मोठा धक्का,माजी आमदाराने घेतला भगवा खांद्यावर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समाजाला जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षाला जोरदार गळती लागली आहे. लोकसभा निवडणुकीत जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी पक्षाला रामराम करत भाजपचे कमळ हातात घेतले होते. लोकसभेवेळी जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले होते. तर आता विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांची गर्दी वाढताना दिसत आहे. यामागे जलसंधारणमंत्री व शिवसेना नेते असणारे तानाजी सावंत यांची शिष्टाई कामाला येत आहे.

विधानसभा निवडणुकी आधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्के बसत आहेत. कारण अनेक निष्ठावान आणि अनुभवी नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकत सत्ताधारी भाजप-सेनेमध्ये प्रवेश केला आहे. आता सोलापूर जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माने यांच्या मनगटावर शिवबंधन बांधत सेनेत स्वागत केले.

दरम्यान,काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी माने यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांच्याशी पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केली होती. त्यातील पाच जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे. त्यामुळे नेत्यांनी विनाअट पक्ष प्रवेश करावा, असा निरोप मातोश्रीवरून देण्यात आला होता.

स्वत:चे दोन साखर कारखाने, अभियांत्रिकी महाविद्यालय व शिक्षण संस्था, सहकारी बँक अशा विविध संस्था ताब्यात असलेले दिलीप माने हे २००९ साली सोलापूर दक्षिण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीही त्यांनी ताब्यात घेतली होती. त्यापूर्वी २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष लढत दिली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!