उत्तरप्रदेश: शक्तीप्रदर्शन करत शेवटच्या दिवशी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची इच्छा सर्वच राजकीय नेत्यांची असते. सर्वांचे अर्ज दाखल झाल्यानंतर आपण आपला अर्ज भरला म्हणजे आपण खूप मोठे नेते आहोत, हे सिद्ध होतं. असं बहुतेक राजकीय नेत्यांना वाटत असतं. त्यामुळे उमेदवाराची अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरताना भरपूर नेत्यांची चांगलीच तारांबळ उडते. अशीच घटना उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरणाऱ्या एका उमेदवाराबरोबर घडली आहे.
विशेष म्हणजे हे उमेदवार कोणी ऐरा-गैरा उमेदवार नव्हता. उत्तरप्रदेश राज्याचे क्रीडामंत्री असलेल्या उपेंद्र तिवारी यांनी धावत-पळत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचावं लागलेलं आहे. त्यांचा उमेदवारी भरण्यासाठी पळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उपेंद्र तिवारी यांनी फेफना विधानसभा मतदारसंघातून 4 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले होते. पण शक्तीप्रदर्शन करत बसल्याने अर्ज भरण्याची वेळ संपत यायला लागली होती. त्यामुळे त्यांना धावत-पळत कार्यालय गाठावं लागलं. गळ्यात हारांच्या माळा आणि सोबत वकिल मंडळींना सोबत घेऊन ते पळत-पळत अर्ज भरण्यासाठी पोहोचले. यावेळी, माध्यम प्रतिनीधींनी त्यांचा व्हिडिओ शूट केला. सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, ते जोरजोरात पळताना दिसत आहेत.
जर ते वेळेत अर्ज भरायला कार्यालयात पोचले नसते, तर त्यांना हे शक्ती प्रदर्शन चांगलेच महागात पडले असते. उत्तरप्रदेशमध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. १० मार्चला या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मतदारसंघातून ३ फेब्रुवारीला अर्ज भरला आहे.
महात्वचा बातम्या:

