Share

पुण्यात शाळा सुरु करण्याबाबत पालकमंत्री अजित पवार यांची महत्वाची घोषणा…

Published On: 

पुणे: पुणे शहरात कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे पुणे शहरात पहिले ते आठवी शाळा पुर्ण वेळ सुरु होणार असल्याची  माहिती पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे पुणे शहरातील शाळा सुरु होणार कि नाही या बाबतीत असणारा गोंधळ आता संपल्यात जमा आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज  उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला .महाराष्ट्र राज्यात नवीन कोरोना  रुग्णांच्या संख्येत घट होत असुन मृत्यूतदारात होणारी  वाढ ही बाब चिंताजनक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी म्हटलं आहे. नवीन रुग्ण संख्येत जगभरात घट होतेय, मात्र मृत्यू वाढत आहेत. राज्यात ४२ टक्के घट झाली, तर पुणे शहरात  ५० टक्के घट झाली आहे. लसीकरणाचे प्रमाण देखील मोठे आहे.

१५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लस उपलब्ध करून देणार असुन . लसीची कमतरता पडणार नाही यासाठी सर्व प्रयत्न करणार आहोत.पुण्यातील जम्बो हॉस्पिटल बाबत २८ फेब्रुवारीपर्यंत विचार करू आणि मार्च मध्ये निर्णय घेऊ असही त्यांनी या वेळेज सांगितले. तसंच कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी झाल्यानंतर राज्यातही नियम शिथील करण्यात येणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच कोरोना निर्बंध लावण्याचे अधिकार जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितलं.

       महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!