Share

“ तो थोडा…” विराट सोबतच्या पहिल्या भेटीबाबत एबी डिव्हिलर्सने केला खुलासा

Published On: 

मुंबई : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाबद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा फक्त दोन नावे समोर येतात. ती म्हणजे विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स. गेल्या काही वर्षांत विराट आणि डिव्हिलियर्स यांनी आरसीबीकडून खेळताना शानदार भागीदारी केली आहे. विराट आरसीबीसोबत अगदी सुरुवातीपासून आहे. तर एबीने २०११ पासून आरसीबीमध्ये सामील झालेला आहे. एबी आणि विराटच्या मैत्रीची चर्चा प्रत्येक सीजनमध्ये होत असते.

आरसीबीच्या पॉडकास्ट मध्ये बोलताना एबीने विराट सोबत झालेल्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले आहे. “एकमेकांना जाणून घेण्याआधी आम्ही काही वेळा एकमेकांना भेटलो. मला त्याच्याबद्दल माहिती होते, त्याला माझ्याबद्दल माहिती होती. मी आधीही खूप वेळा बोललो की तो लहान असताना थोडा उद्धट होता, त्यामुळे माझ्यासाठी त्याचे पहिले इम्प्रेशन असे होते. तो सगळ्यांना आदर करायचा तरी मला वाटायचे कि तो थोडासा हुशारक्या मारणारा आहे. तरी मी त्याला गृहीत धरले नव्हते, कारण त्या वयात ते गरजेचे होते. आमची खरोखरच छोटीशी चर्चा झाली होती, मी त्याची प्रशंसा केली नाही . पण, मला स्पष्टपणे आठवते की वँडरर्समध्ये जेव्हा मला आरसीबीने संघात घेतले आणि एकत्र खेळण्यासाठी उत्सुक असल्याची छान चर्चा झाली होती.”

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांचे केवळ मैदानावर नाही तर मैदानाबाहेर सुद्धा चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. एबी विराटला प्रेमाने “बिस्कोटी” म्हणतो. तसेच त्यांचे परिवार सुहा एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. एबी डिव्हिलियर्सने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये खेळाच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.तथापि, तो लवकरच एका नवीन भूमिकेत दिसणार आहे, कारण त्याने दक्षिण आफ्रिकेतील तसेच आरसीबीमधील तरुणांना मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!