पुणे: राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप पक्षात गेले होते. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांची पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात घरवापसी होणार का या प्रश्नांना उधान आले आहे.
भोसले यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिल्या. यावेळी त्यांनी साताऱ्यातील कामांविषयी अजित पवार यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगितले. विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अजित पवारांना विनंती केले असे सांगितले. घरपवासी करणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना काही सेकंदांचे मौन धरत त्यांनी, ‘शिवाजी महाराजांचे जसे सर्व धर्म सम भाव असे धोरण होते, तसेच माझे सर्व पक्ष समभाव असे धोरण आहे” अशी प्रतिक्रिया दिली.
वाईन विक्री प्रश्नावर विचारणा केली असता, “याविषयी लोकशाही व्यवस्थेत निवडून दिलेले प्रतिनिधी उत्तर देतील. राजेशाही असती, तर मी उत्तर दिलं असतं”, तसेच “प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं. एकदा व्यक्ती सज्ञान झाली की काय करायचं हा निर्णय त्या व्यक्तीने घ्यायचा असतो. वाईन विक्री बंद करा किंवा सुरू ठेवा, लोकांनीच आपल्या शरीराचा वा आरोग्याचा विचार करायला हवा”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
“कोहली आणि कुंबळे यांचे जमत नव्हते” ; माजी व्यवस्थापकांचा गौफ्यस्फोट
“…मगच निर्बंध शिथिलतेसंदर्भात निर्णय घेणार”, अजित पवारांचे स्पष्टीकरण
“ओवेसींचे भाषण ऐकून अस्वस्थ झालो आणि जीवे मारण्याचा कट रचला”, आरोपींची पोलिसांसमोर कबुली
सचिन तेंडुलकरने केले भारतीय क्रिकेट बद्दल एक मोठे वक्तव्य …
राज्यात सध्या महाविकास आघाडीचे नव्हे तर टोळी सरकार आहे- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

