Share

“रोहित पवारांच्या बापाने कायदा लिहिलाय काय?” ; गोपीचंद पडळकर आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

जेजुरी:  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 297वी जयंती आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. चौंडीत जाण्यापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवलं आहे. यावरून राजकीय वाद पेटले आहेत. यावेळी गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा रोहित पवारांवर टीका केली आहे.

गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला असल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. यावेळी गोपीचंद पडळकरांनी माध्यमांशी बोलताना रोहित पवार आणि शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. “पोलीसबळाचा शरद वापर करत आहेत. अहिल्यादेवीच्या जयंती निम्मित तुम्ही आज कित्ती चुकीच्या पद्धतीने वागताय यातून तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? हे सर्व महाराष्ट्रातील लोक पाहत आहेत. तुमच्यात धमक असेल तर समोरासमोर सभा भरवा”, असे थेट आव्हानच गोपीचंद पडळकर यांनी दिले आहे.

रोहित पवारांच्या अगोदर (१९) मे रोजी अहिल्यादेवी होळकर कार्यक्रमासाठी मी परवानगी मागितली होती. पण रोहित पवारांना माझ्या अगोदर परवानगी दिली. रोहित पवारांच्या बापाने कायदा लिहिलाय का?” असा सवाल करत गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे राजकारण सुरु – 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी या जयंतीचे राजकारण सुरू केले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर आणि झेंडे लावून जयंतीचा कार्यक्रम केला जातोय. तो आम्ही कदापि सहन करणार नाही. चौंडी हे आमचं प्रेरणास्थान आहे. आमच्या चळवळीचे ठिकाण चौंडी आहे. आपला हा समाज नेमका कुठून जागा होतोय हे पवारांना कळलं म्हणून त्यांनी चौंडी ताब्यात घेण्याचं  षडयंत्र रचलं असून उद्या तिथं दंगल घडविण्याचा प्लॅन शरद पवार आणि रोहित पवार यांनी आखला आहे असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!