Share

“…आणि शेवटच्या क्षणी शिवसेनेने संभाजी राजेंचा घात केला” ; गिरीश महाजनांची घणाघाती टीका

Published On: 

मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याची खेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपची होती, असा गौप्यस्फोट संभाजीराजेंचे पिता शाहू छत्रपती यांनी केला. यानंतर २९ मे रोजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत शाहू छत्रपतींच्या भेटीसाठी थेट कोल्हापूरातील राजवाड्यावर गेले होते. भाजपच्या या खेळीवर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. यावर आता माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेवरजोरदार टीका केली आहे.

संजय राऊतांना उठता बस्ता झोपता जागताना फक्त भाजप दिसतं. संभाजीराजांनी उद्धवजींची भेट घेतली होती त्यांच्याकडे मागणी केली होती, शेवटपर्यंत त्यांना हो हो सांगितलं. शेवटच्या क्षणी शिवसेनेने त्यांचा घात केला. आता खापर कोणावर फोडायचं काही झालं तर संजय राऊतांना भारतीय जनता पक्ष दिसतोय. त्यांना शिवसेना पक्ष संपवायचा आहे. राज्यातील सर्व विषय त्यांच्यासाठी संपले. त्यांच्यासाठी विषय आता किरीट सोमय्या आहे, राणा आहे आणि ईडी आहे. त्यांच्याशिवाय त्यांच्याकडे विषय नाही. आता लोक हे त्यांचे ऐकून ऐकून कंटाळले तर आपण लांब पल्ल्याच्या विचार केला तर शिवसेनेला संजय राऊत संपवतील. अशी घणाघाती टीका यावेळी गिरीश महाजनांनी संजय राऊत यांच्यावर केली.

कुठलीही मदत या अडीच वर्षांमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना केलेली नाही. त्यामुळे ते आता कटोरे घेऊन फिरत आहेत, स्वतःचं अपयश झाकण्यासाठी. कुठे आता केंद्राकडे बोट दाखवायचं, त्यांच्यावर आरोप करायचे लोकांना आता कळाले आहे. हे सरकार रिकामे आहे मुख्यमंत्री फक्त बोलण्यापुरते आहेत कृतीतून काहीच त्यांच दिसत नाही. असे बोलत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही त्यांनी निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!