🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचा अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये धनश्री वर्मा पती युजवेंद्र चहल आणि राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर यांना डान्स शिकवताना दिसत आहे. आयपीएलच्या फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाला असेल, पण ऑरेंज आणि पर्पल कॅपवर राजस्थानच्या बटलर आणि चहलने कब्जा केला.
धनश्री वर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये चहल आणि बटलर धनश्रीसोबत डान्स करताना दिसत आहेत. काही वेळाने बाजूला उभा राहून चहल धनश्री आणि बटलरच्या डान्स मूव्ह्ज काळजीपूर्वक पाहू लागतो. नंतर बटलर चहलच्या प्रसिद्ध स्टेपची नक्कल करतो, जी त्याने यंदा हॅट्ट्रिक घेतल्यानंतर मैदानात केली होती. डान्सनंतर बटलरने चहल आणि धनश्रीला मिठी मारली.
https://www.instagram.com/reel/CeLL0ECIZwz/?utm_source=ig_embed&ig_rid=cb3ad30c-afc3-4944-8094-fb8361f9f08e
बटलरने आयपीएलच्या या हंगामात १७ सामन्यांमध्ये १४९ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने सर्वाधिक ८६३ धावा केल्या. यादरम्यान त्याने एकूण ४ शतके झळकावली. बटलरने आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. दुसरीकडे चहलने १७ सामन्यात २७ बळी घेतले. चहल हा आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणारा फिरकी गोलंदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
