🕒 1 min read
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आता एका मागोमाग एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतच ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिकेत आहे. १३ मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाची सर्व महाराष्ट्रात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १३.८७ कोटींच बॉक्स ऑफिस कलेक्शन केलंय. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीती रणवीर सिंग याचा ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासून सोशल मिडीयावर चर्चेत होता.
याबाबत झी स्टुडीओचे व्यवसाय प्रमुख म्हणाले, “मराठी चित्रपटासाठी हा अभिमानाचा दिवस आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १३.८७ कोटींची कमाई केली आहे. आपण नेहमी ऐकतो, मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाहीत पण चित्रपट चांगला दर्जेदार असेल तर चित्रपटगृहांकडून समोरून विचारणा होते. चित्रपट चांगला असेल तर प्रेक्षक डोक्यावर घेतात याचचं उत्तम उदाहरण ‘धर्मवीर’ चित्रपट आहे. हा चित्रपट कमाईचे नवे शिखर घाठेल.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
