🕒 1 min read
सोलापूर: माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधत जोरदार टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षांनंतर मास्क काढला. त्याच्या बातम्याही आल्या. तुमचा चेहरा काय चंद्राचा होता काय? असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला.
शरद पवारांना शेतकऱ्यांचे जाणते राजे मी मुळीच म्हणणार नाही. ते तर शेतकऱ्यांचे प्रपंच मातीत घालणारे लुटारू राजे आहेत. राज्याचे सर्वांत अधिक नुकसान बारामतीकरांनी केलं आहे. नवाब मलिकांच्या जावयाकडे गांजा सापडला तर ती तंबाखू आणि एखाद्या शेतकऱ्याने खसखस पिकवली तर गांजा पिकवला म्हणून तुरुंगात टाकता. हा कुठला न्याय? असा सवालही सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस तुम्ही राज्यात पुन्हा येणार आहात असा दावा करत उजनीतून बारामतीला एक थेंब ही पाणी जाऊ देणार नाही. पालकमंत्र्यांनी कंस मामाची भूमिका घेऊ नये अन्यथा श्रीकृष्ण रूपी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने कंस मामाला आम्ही गाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही सदाभाऊ यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस: खडसेंचे सेना आमदारावर गंभीर आरोप
- IPL 2022 : बापरे! विराट कोहलीनं शुबमन गिलकडं पाहत केला अंडरटेकर स्टाईलने खतरनाक इशारा; पाहा VIDEO!
- बिग बॉस फेम निकी तांबोळीचा हॉट लुक पाहून चाहते घायाळ, VIDEO होतोय व्हायरल
- पुण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार? मनसे प्रवक्ते गजानन काळे म्हणाले…
- उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात राऊत यांचा एजंट नवाब मलिक – किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
