🕒 1 min read
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात २२ मे रोजी (रविवारी) सभा होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे राज ठाकरे यांची सकाळी १० वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच मनसेला पुण्यात चांगलाच दणका बसला आहे. मनसेचे २० पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिली आहे.
शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत शिवसेना शहर कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यातून प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान शिवसेनेचा मनसेला हा मोठा दणका असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे निलेश माझिरे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर या २० पदाधिकाऱ्यांचा निर्णय पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. आता उद्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजर असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस: खडसेंचे सेना आमदारावर गंभीर आरोप
- IPL 2022 : बापरे! विराट कोहलीनं शुबमन गिलकडं पाहत केला अंडरटेकर स्टाईलने खतरनाक इशारा; पाहा VIDEO!
- बिग बॉस फेम निकी तांबोळीचा हॉट लुक पाहून चाहते घायाळ, VIDEO होतोय व्हायरल
- पुण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार? मनसे प्रवक्ते गजानन काळे म्हणाले…
- उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात राऊत यांचा एजंट नवाब मलिक – किरीट सोमय्या


