मुंबई : मुक्ताईनगरमध्ये पुन्हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस, असा सामना रंगला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले.
आपण मंजूर करुन आणलेल्या २१७ कोटी रुपयांच्या कामांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करुन स्थगिती मिळविली आहे. हा एक प्रकारचा जातीयवाद आणि करंटेपणा आहे, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला. शुक्रवारी सायंकाळी मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.