Share

IPL 2022 DC vs MI : बंगळुरू मांगे मुंबईचा विजय! काय आहे समीकरण? वाचा एका क्लिकवर…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामातील ६९वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मुंबई संघ आगोदरच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. मात्र प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दिल्लीला हा सामना जिंकणं अतिशय महत्त्वाच आहे. यंदाचा आयपीएल हंगाम आता शेवटच्या काही सामन्यापुरता शिल्लक राहिला आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायन्ट्स या दोन नव्या फ्रेंचाईजींनी प्लेऑफ गाठले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तर दुसरीकडे पाच वेळा आयपीएल विजेतेपद जिंकणारा मुंबई संघ आणि चार वेळचा विजेता चेन्नई संघ गुणतालिकेत मात्र तळाशी राहिले आहेत.

दिल्लीसाठी विजय महत्त्वाचा

आजचा सामना दिल्लीला मुंबईविरुद्ध खेळायचा आहे. मुंबई संघाला यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करता आलेली नाही तर दुसरीकडे दिल्लीला हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये जाण्याची मोठी संधी आहे. कारण आयपीएल गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या दिल्ली संघाचे १४ अंक आहेत. दिल्लीने जर मुंबईला हरवले आणि दोन अंक मिळवले तर त्यांचे गुणतालिकेत १६ अंक होतील. त्याच बरोबर बंगळुरू संघाचेही १६ अंक आहेत. मात्र दिल्लीचा नेट रनरेट बंगळुरूपेक्षा चांगला आहे. त्यामुळे दिल्लीचा संघाने सामना जिंकला तर सहज प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.

बंगळुरूच्या नजरा मुंबईच्या विजयावर

बंगळुरू संघाने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत १६ अंकावर पोहोचला आहे. मात्र चौथ्या स्थानासाठी दिल्ली आणि बंगळुरू यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. कारण आजच्या सामन्यात जर दिल्लीने मुंबईचा पराभव केला तर दिल्लीचे गुणतालिकेत १६ अंक होतील आणि ते सहज प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. बंगळुरू संघाचेही १६ अंक आहेत मात्र बंगळुरूचा नेट रनरेट दिल्लीपेक्षा खराब आहे. त्यामुळे बंगळुरू संघाचे चाहते आता मुंबईच्या विजयासाठी प्रार्थना करताना पाहायला मिळतील. कारण जर मुंबईने दिल्लीचा पराभव केला तर बंगळुरूचा संघ सहज प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!