🕒 1 min read
मुंबई : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ३० डिसेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार समुद्धी पॅनल तर भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक समुद्धी पॅनल रिंगणात आहेत. आज सकाळीच मतमोजणीला सुरुवात झाली. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून सतीश सावंत पराभूत झाले आहेत. भाजपचा ९ तर महाविकास आघाडीचा ५ जागांवर विजय झाला आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
धरणमूत्र पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत होती पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला, कारस्थान करून निवडणूक जिंकता येईल असं वर्गणी चोरांना वाटतं होतं पण ही सिंधुदुर्गाची माती आहे इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो. काळया विन्या राऊत तू बोलत रहा आमची निवडणूक सोप्पी होते.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 31, 2021
निलेश राणे ट्विट करत म्हणाले, ‘धरणमूत्र पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत होती, पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला. कारस्थान करून निवडणूक जिंकता येईल असं वर्गणी चोरांना वाटतं होतं, पण ही सिंधुदुर्गाची माती आहे. इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो. काळया विन्या राऊत तू बोलत रहा आमची निवडणूक सोप्पी होते.’ अशा शब्दात निलेश राणेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
जिल्हा बँकच्या १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. आज सकाळीच मतमोजणीला सुरु झाली असून राणे आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माध्यमिक शिक्षक पतपेढीत ही मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत ९८१ पैकी ९६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी तीन फेऱ्यामध्ये आठ टेबलांवर एकाच वेळी होत आहे. दुसऱ्या टप्प्यात महिला उमेदवारांची मतमोजणी केली जाईल. मतमोजणीचा निकाल यायला जवळपास दीड ते दोन तास लागण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत ‘मविआ’ला मोठा धक्का; भाजपला ९ तर मविआला ५ जागा
- तुम्ही मास्क का नाही वापरत, यावर संजय राऊत म्हणतात, “मी मोदींना फॉलो करतो”
- ‘बेळगावच्या तरुणांनी महाराष्ट्रासाठी लढा द्यायचा व सरकारने…’, शिवसेनेचे टीकास्त्र
- “छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरील हल्ल्याचा निषेध करणे देशद्रोह कसा?”, संजय राऊतांचा सवाल
- ऐतिहासिक कामगिरी; 113 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने मालिकेत घेतली आघाडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
