टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना लक्ष्य केले आहे. परळीच्या तिर्थक्षेत्रासाठी, 133 कोटी रुपये आणले असल्याचा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे. यावरून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना एकाच व्यासपीठावर येण्याचे खुले आव्हान केले आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, परळीच्या जनतेची फसवणूक केली जात आहे.133 कोटी रुपयांचा कामाचा फक्त डीपीआर मंजूर आहे. डीपीआर मंजूर होणं आणि पैशाची तरतूद होणं यात फार मोठा फरक आहे. आपल्या परळीच्या तिर्थक्षेत्रासाठी, 133 कोटी रुपये आणले म्हणून डिजिटल लावून सांगितलं. मात्र पैशाची तरतूद फक्त दहा कोटीचे आहे. आणि हे जर खोटं असेल तर, " याच व्यासपीठावर परळीकरांच्या समोर त्यांनी यावं आणि मी येतो मग होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी, असं खुलं आव्हान पंकजा मुंडे यांना दिलं आहे.
दरम्यान परळी नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या कडून निधीमध्ये अडवणूक केली जात असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. प्रत्येक विकास कामात अडथळा आणला जातो, त्यासाठी केजच्या आमदाराला पुढे करून लक्षवेधी लावल्या जातात, नगरपालिकेचा निधी बांधकाम विभागाकडे वळवला जातो. अल्पसंख्यांक विभागाचा निधी अडवला जातो, अशा प्रकारचे राजकारण करण्यापेक्षा 10 वर्ष आमदार, 5 वर्ष मंत्री असताना काय कामे केली, असा धनंजय मुंडे यांनी सवाल उपस्थितीत केला आहे.
- ‘कविता करणारे मंत्री होऊ शकतात तर बाबासाहेबांचे वंशज मुख्यमंत्री का होऊ शकत नाहीत’
- राष्ट्रवादीचे नेते भाजपात पाठवणे ही शरद पवारांचीचं खेळी, वंचित नेत्याचा गंभीर आरोप
- बाजार समिती गैव्यवहारप्रकरणी दिलीप सोपलांना उच्च न्यायालयाचा दिलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

