टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते भाजपात पाठविण्याची शरद पवारांचीच खेळी? असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष अॅड. आण्णाराव पाटील यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने ‘सत्ता संपादन यात्रा’ काढली आहे. या यात्रेचे आज सोलापूर येथे आगमन झाले. यावेळी अॅड. आण्णाराव पाटील यांनी हा आरोप केला.
यावेळी पाटील म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे़ अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे ३७० जातींचे प्रतिनिधीत्व करतात. यामुळेच त्यांनी लोकसभेमध्ये अनेक जातींच्या लोकांना प्रतिनिधीत्व दिले़. तसेच मुस्लीम बांधवाना ही संधी दिली. मात्र वंचितच्या जीवावर निवडून आलेल्या एमआयएम पक्षाने मात्र ऐन वेळी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच सध्या पक्षांतर होत आहेत. मात्र राष्ट्रवादीचे नेते भाजपात पाठविण्याची शरद पवारांचीच खेळी आहे, असा आरोप यावेळी पाटील यांनी केला.
दरम्यान भाकप सरकार हे ईव्हीएम मशिनच्या बळावर निवडून आले आहे़. आम्हाला उशीर लागला तरी प्रामाणिकपणे सत्तेवर येऊ़, अशी टीका पाटील यांनी केली. तसेच कविता करणारा जर आज केंद्रीय मंत्री होऊ शकतो तर बाबासाहेबांचे वंशज अॅड. प्रकाश आंबेडकर का मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत़? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. वंचित बहुजन आघाडीला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून २८८ जागांसाठी साडेसहा हजार उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.
- ‘मी खुप राजकारण बघितलं पण आता सत्तेवर असणाऱ्यांचं राजकारण वेगळचं’
- राष्ट्रवादीला धक्का, ‘या’ नेत्याने दिली पक्षाला सोडचिठ्ठी
- सामनाच्या अग्रलेखावरून उदयनराजेंचे शिवसेनेला प्रत्युत्तर, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

