मुंबई : अरे सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यांचे सीमोल्लंघन करीत आली आहे, असं म्हणत शिवसेना पक्षाने सामना अग्रलेखातून भाजप पक्षावर हल्ला केला होता. अशातच भाजप नेते अशिष शेलार यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे.
अशिष शेलार यांचे वक्तव्य-
आम्हाला सडक्या मेंदूते म्हणणाऱ्यांचे कर्तबगार नेते पक्ष सोडून गेले. बंधू’राजां’नी वेगळी चूल मांडली, असं म्हणत अशिष शेलार यांनी शिवसेनेवर चांगलाच हल्ला केला आहे. यासंदर्भात शेलारांनी आपल्या ट्विटर आकाऊंवरून एक ट्विट केलं आहे.
आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय?
खासदार, आमदार, नगरसेवक कंटाळले. वाममार्गाने मिळवलेले मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले, तरी पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरु आहे. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आळवताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय?, असे खोचक सवालही अशिष शेलार यांनी याठिकाणी केले आहेत.
तसेच, नाचता येईना अंगण वाकडे, स्वत:चे अपयश झाकायला आता पर्याय तोकडे असा टोला शेलारांनी लगावला आहे. त्याचबरोबर फोडा झोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल वाचवा हेच मिशन सुरु आहे, त्याचे काय?, असा सवालही त्यांनी शिवसेनेला केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | संजय राऊत यांची न्यायालीन कोठडीत पुन्हा वाढ, ‘इतके’ दिवस लांबवली कोठडी
- Shivsena | “अरे सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता…”; सामनातून भाजपवर निशाणा
- Maharashtra | शिंदे सरकारचा सर्वसामान्यांना झटका! राज्यात विजेच्या दरात वाढ
- Gopichand Padalkar | “एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झालेत हे सुप्रिया सुळेंना सहन होईना”
- Gulabrao Patil | तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत- गुलाबराव पाटील


