मुंबई : शिवसेनेतून बंद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३९ आमदारांनी पाठिंबा दिला. यानंतर महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आमदारांनंतर आता शिवसेनेतील खासदारांमध्ये देखील नाराजी असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेवर टीका केली.
आता यांचे खासदार पण म्हणतायेत आपण भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान करायला हवं. आधी रेडे, प्रेतं, घाण आणि आता सगळे खासदार सोडून गेल्यावर पिता-पुत्र आणि विश्वप्रवक्ते पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांसाठी कोणत्या नवीन शब्दांचा वापर करायचा? या विचारात असल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे, अशी घणाघाती टीका गजानन काळे यांनी केली आहे.
दरम्यान, शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार, 20 माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. तसेच काही खासदारांना आपण भेटलो असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार असल्याचा निर्धार केल्याचे गुलाबराव पाटील यांनी यावेळी उपस्थित समर्थकांना सांगितले. तसेच आम्ही उद्धव ठाकरेंना सोडलं नाही, तर त्यांनी आम्हाला सोडलं असल्याचं देखील त्यांनी त्यांच्या समर्थकांना बोलून दाखवलं.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

