मुंबई : राज्यातील शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आहे. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यात नवं शिंदे सरकार स्थापन झालं. यानंतर आज राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यापूर्वी रविवारी संध्याकाळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना आमदारांच्या गटाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली.
यानंतर शिवसेनेच्या आणखी एका आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढली. आज झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे गट आणि भाजप सरकारने बहुमत चाचणी पास केली. 164 पेक्षा जास्त मते शिंदे गट आणि भाजपला मिळाली. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा झटका मानला जात आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदनाच्या प्रस्तावाचं भाषण सुरु झालं.
यावेळी फडणवीस म्हणाले की, शिवसेना भाजप युतीचे आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला याबाबत मी शिंदे यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. यानंतर शिवसेना भाजप युतीचा विजय असो, अशी घोषणाबाजी करत शिंदे सर्मथकांकडून जल्लोष करण्यात आला.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज अजूनही सुरू आहे. सध्या याबाबत कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाही. विरोधकांनी सभागृहात मतदानाची मागणी केली होती. त्यानंतर मतमोजणीद्वारे बहुमताचा निर्णय घेण्यात आला. आज बहुमत चाचणीच्या आधी शिवसेनेचे आणखी एक आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठातरे गट सोडून शिंदे गटात सामिल झाले आहेत. अशाप्रकारे आता उद्धव ठाकरे गटात फक्त १५ आमदार उरले आहेत. उर्वरित ४० आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :


