मुंबई : राज्यातील शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आहे. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यात नवं शिंदे सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३९ आमदारांना सोबत त्यांनी शिवसेनेविरोधात आणि थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारलं आहे. यानंतर या सगळ्या घडामोडींवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
देशपांडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून एक मिम शेअर करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. मिम मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं एक कार्टून चित्र शेअर केलं आहे. त्यामध्ये असं म्हंटल आहे कि, बाबा एक आयडिया सुचलीये. आपण शिवसैनिकांच्या शिवबंधन आणि प्रतिज्ञा पत्राऐवजी जीपीएस ट्रकारच बांधूया, अशी मिम त्यांनी शेअर केली आहे.
दरम्यान, राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल, त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आता विरोधी बाकावर बसणार असलो, तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना स्पष्ट होईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडलं तर मध्यवर्ती निवडणुका लागतील. त्यामुळे त्याची तयारी आतापासून करा, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

