मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल गर्ल अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ला ओळखलं जात. ही अभिनेत्री कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतीच सई तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सईने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटी सुद्धा कमेंटचा वर्षाव करत आहेत.
अनिशच्या वाढदिवसानिमित्त सईने दोघांचा एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नाला हे दोघे एकत्र उपस्थित होते. तेंव्हापासून या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा देखील सोशल मीडियावर सुरू झाल्या. एवढेच नाही तर मागच्या काही दिवसांपूर्वी सईने अनिशचा फोटो पोस्ट करत तिच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या.
https://www.instagram.com/p/Cfe4BBCv8bS/
सईने पोस्ट केलेल्या फोटोवर अनिशसोबत अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर चाहत्यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, “काय झाडी.. काय डोंगुर.. काय हाटील.. एकदम ओके..” असं लिहिले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या :


