Share

Maharashtra Floor Test : शिंदे गट-भाजप सरकार बहुमत चाचणीत पास! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या नव्या महाराष्ट्र सरकारने आज अग्निपरीक्षा दिली. राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यापूर्वी रविवारी संध्याकाळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना आमदारांच्या गटाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. शिवसेनेच्या आणखी एका आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची ( शिंदे गट ) ताकद वाढली.

दरम्यान, आज झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे गट आणि भाजप सरकारने बहुमत चाचणी पास केली. १६४ मते शिंदे गट आणि भाजपला मिळाली. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा झटका मानला जात आहे. तर प्रस्तावाच्या विरोधात ९९ मते होती. त्यामुळे अखेर राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज अजूनही सुरू आहे. सध्या याबाबत कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाही. विरोधकांनी सभागृहात मतदानाची मागणी केली होती. त्यानंतर मतमोजणीद्वारे बहुमताचा निर्णय घेण्यात आला. आज बहुमत चाचणीच्याआधी शिवसेनेचे आणखी एक आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठातरे गट सोडून शिंदे गटात  सामिल झाले आहेत. अशाप्रकारे आता उद्धव ठाकरे गटात फक्त १५ आमदार उरले आहेत. उर्वरित ४० आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत.

आदित्य ठाकरेंसह उर्वरित १५ आमदारांना निलंबनाचा धोका-

उद्धव गटाचे शिवसेनेच्या वतीने व्हीप सुनील प्रभू यांनीही व्हीप जारी करत विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा आदेश जारी केला आहे. मात्र उद्धव गटाचे व्हिप सुनील प्रभू यांची मान्यता विधिमंडळ सचिवालयाने रद्द केली आहे. व्हीप जारी करण्याचा अधिकार शिंदे गटाच्या आमदारांना असल्याने उद्धव गटाच्या उर्वरित १५ आमदारांवरही व्हीप विरोधात गेल्यास कारवाईचा धोका निर्माण होणे साहजिक आहे. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे यांच्यावरील निलंबनाचा धोकाही वाढला आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!