आजरा : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकीत अनेकवेळा केले आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील असा कोल्हापूर जिल्ह्रयातील आजरा तालुक्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी दावा केला आहे.
“येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील व त्यांच्याच हस्ते स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांचा ६१ ची कार्यक्रम होईल” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या स्वामी विवेकानंद पत संस्थेच्या वतीने उभारलेल्या श्री लक्ष्मी देवी उद्यान लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
सरकार फार काळ टिकणार नाही –
चंद्रकांत पाटील यांनी सरकार फार काळ टिकणार नाही असे विधान केले होते. ‘आठवीतलं पोरगं पण सांगेल हे सरकार फार काळ टिकणार नाही. आम्हाला ते पाडण्यात रस नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत.’ असं पाटील म्हणाले होते. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंधांची घोषणा केल्यानंतर गरजू घटकांसह हातावर पोट असलेल्या (रिक्षाचालक, फेरीवाले, बांधकाम मजूर आदी) नागरिकांसाठी घोषित केलेलं पाच हजार चारशे कोटी रुपयांच्या पॅकेजवर देखील टीका केली होती. ‘हे पॅकेज फसवं आहे. असेही चंद्राकांत पाटील म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या –


