मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात तुफान खडाजंगी पाहायला मिळाली आहे. पहिल्या दिवशी अधिवेशनात विरोधी आणि सत्त्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची तुफान खडाजंगी पहायला मिळाली. शिवसेने (Shivsena)चे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narenrda Modi) यांची नक्कल केली. यावरुन सभागृहात मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाला.
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी बोलताना नरेंद्र मोदी यांची काही वाक्ये हिंदीत, नक्कल करून बोलली. यानंतर देशाच्या पंतप्रधानांची या सभागृहात नक्कल करणे, हे शोभनीय वक्तव्य नाही. भास्कर जाधव यांनी जाहीर माफी मागावी किंवा त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.
याच मुद्द्यावरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. हा लोकशाहीचा फड असून त्याला तमाशाचा फड होऊ देऊ नका. आज ठेचले नाही तर पवित्र सभागृह अडचणीत येईल. असे बोलणे थांबवले नाही तर प्रत्येक सदस्य असेच बोलेल. प्रत्येक नेता परिश्रमाने मोठा होतो. त्यांच्याबद्दल अंगविक्षेप केले तर माफी मागायलाच हवी, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
तसेच पुढे, ही प्रथा अत्यंत वाईट आहे. भास्कर जाधव यांची ही पहिलीच घटना नाही. विधानसभेच्या बाहेर नक्कल केली असली तरी ती योग्य नाही. वारंवार असे केल्यास पराभूत होतील. सभागृहापेक्षा हे मोठे आहेत का? अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला शब्द देतो, हे रेकॉर्डवरून काढले नाहीत, तर त्यांच्यापेक्षा चांगल्या नकला मी करू शकतो. आम्ही पुस्तके दाखवतो. काहीतरी बोल पण रेटून बोल, हे असे होत नाही. तुम्ही तर्कावर तर्क द्या, असा हल्लाबोल सुधीर मुनगंटीवार यांनी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- गेवराईतील वाळू प्रकरण विधानसभेत गाजले; महसूलमंत्र्यांकडून भरारी पथकांची स्थापना..!
- अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?; पेडणेकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल
- मोदींची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना तात्काळ निलंबित करा; देवेंद्र फडणवीस आक्रमक
- ‘मविआ’मध्ये महिलांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही- रुपाली पाटील ठोंबरे
- हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस; विविध मुद्यांवरुन भाजपा ठाकरे सरकारला घेरणार?


