🕒 1 min read
बंगळुरू : तिरुपती, तिरुमाला देवस्थान परिसरात आज पुन्हा एकदा कालसारखीच धक्कादायक घटना घडली आहे. आज ही तिरुमाला देवस्थान परिसरातील चेकपोस्टवर नांदेडच्या एका युवकाची गाडी अडवण्यात आली. जर देवस्थान परिसरात दर्शन घेण्यासाठी जायचं असेल तर गाडीमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती काढून टाकण्यास सांगितले गेले. ही सगळी घटना सांगतानाचा या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कालही अशीच एक घटना घडली होती आणि आज ही तेच झाल्यामुळे महाराष्ट्रातून या घटनेचा निषेध केला जात आहे.
या व्हिडिओमध्ये हा तरुण सांगत आहे कि त्याने चेकपोस्टवरील अधिकाऱ्यांना या संदर्भात कारण विचारले असता त्यांनी सांगतिले कि त्यांना या बाबतीत काही माहित नाही. त्यामुळे तो युवक तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना (एसआय) भेटला. गाडीत शिवाजी महाराजांची मूर्ती का चालत नाही, असे त्याने त्या अधिकाऱ्याला विचारल्यावर त्यांनी सांगतले कि या देवस्थानच्या सेक्शन अंतर्गत मूर्ती आत न्यायला मनाई नाही. मात्र या संदर्भातला कोणताही लिखित पुरावा त्यांनी दाखवला नाही. हे अधिकारी केवळ एकच गोष्ट सांगत होते कि काहीही झालं तरी मूर्ती गाडीत घेऊन दर्शनासाठी जाता येणार नाही. आता अशा अटी नक्की का घातल्या जात आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Raj Thackeray : शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु – राज ठाकरे
- Raj Thackeray : पवारांनी सांगितलं म्हणून मी माझा पक्ष काढेल का? राज ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
- Shinde Government : हे सरकार शेतकऱ्यांसाठी अपयशी ठरतय का? २४ दिवसांत ८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!
- Eknath Shinde | आम्ही बाळासाहेबांना आवडणारी भूमिका घेतली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Sharad Pawar | बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवचरित्रावर दुसऱ्या कोणी केला नाही – शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
