Share

Neeraj Chopra : नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ‘या’ बड्या नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

Published On: 

मुंबई : भारताच्या नीरज चोप्राने अमेरिकेतील यूजीन येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. त्याने भालाफेक स्पर्धेत ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक करत रौप्यपदक जिंकले आहे. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नीरज चोप्राला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनीही त्याला यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

‘आपल्या देशाच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेल्या नीरज चोप्राने मोठे यश संपादन केले आहे. या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. भारतीय खेळांसाठी हा खास क्षण आहे. नीरज चोप्राला त्याच्या पुढील स्पर्धेसाठी आणि भविष्यासाठी शुभेच्छा.’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत नीरज चोप्राला त्याच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

या चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये लांब उडी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. पण, नीरजने त्याच्या एक पाऊल पुढे टाकत रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. नीरजने गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. या पदकासह त्याने वैयक्तिक खेळांमध्ये भारताचा १२० वर्षांचा दुष्काळ संपवला होता. भारतासाठी ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. आता त्याने जागतिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकून आणखी एक मोठी कामगिरी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महाराष्ट्रातीलही मोठ्या नेत्यांनी नीरज चोप्राला त्याच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे देशात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्याला त्याच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्वच स्तरातून शुभेच्छा भेटत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!