अयोध्या : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला ज्यांनी कडाडून विरोध केला त्या भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे अयोध्येत स्वागत केले. दरम्यान शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी बृजभूषण सिंह यांची अयोध्ये येथे भेट घेतली आहे. तसेच बृजभूषण यांनी राज ठाकरे यांच्याविषयीच्या भूमिकेचे समर्थन संजय राऊत यांनी केल्याचे सांगितले जात आहे. “बृजभूषण सिंह यांना अनेक वर्ष ओळखतो. ते शहाणे राजकारणी आहेत. राज ठाकरेंना उगाच विरोध करणार नाहीत,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अयोध्येत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी बृजभूषण सिंह यांच्या भूमिकेचं समर्थन केले आहे. बृजभूषण सिंह यांना मी गेली अनेक वर्षे ओळखतो. ते कधीही विरोधासाठी विरोध करत नाहीत. बृजभूषण सिंह हे कुस्तीक्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरचं नाव आहे. त्यामुळे बृजभूषण सिंह हे राज ठाकरे यांना विरोध करत असतील त्यामागे त्यांच्या राज्याच्या काही समस्या असतील, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेना मागील अनेक वर्षांपासून अयोध्येत येत आहे. शिवसेना आणि अयोध्येतील स्थानिक नेत्यांचे, लोकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बृजभूषण सिंह यांची भेट घेतली. मी बृजभूषण सिंह यांना काही आज ओळखत नाही, गेल्या ३४-३५ वर्षांपासून ओळखतो. आम्ही नेहमी फोनवरून चर्चा करतो. पण बृजभूषण सिंह यांचा राज ठाकरे यांना का विरोध आहे, हे मला माहिती नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

