Share

Devendra Fadanvis | “मला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला”, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गटनेत्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी भाजप, शिंदे-फडणवीस सरकार यांच्यावर जोरदार टीका केली. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही शेवटची निवडणुक असणार असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे. यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

2019 मध्ये माझा शेवट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तिघांनी मिळून एकत्रितपणे मला संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक आरोप भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच, मात्र, ते मला संपवू शकले नाहीत आणि संपवू शकणारही नाहीत असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

यापुर्वीसुद्धा अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर गद्दारीचा आरोप केला होता. अशातच आता, आमच्यासोबत निवडून आमच्याच पाठित खंजीर खुपसला, असा आरोप फडणवीस यांनी पुन्हा केला. तसेच अशावेळी तुम्ही राजीनामे का दिले नाहीत? तेव्हा का निवडणुका घेतल्या नाहीत? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत निवडून आला नव्हतात, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा लावून निवडून आलात अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली आहे.

मुंबईवर लचके तोडणारी गिधाडं फिरू लागली आहेत, अमित शहा म्हणाले सेनेला जमीन दाखवा, मात्र, त्यांना माहिती नाही की इथल्या जमिनीत तलवारीची पाती आहे, मुंबई आमच्यासाठी मातृभूमी आहे, अशी टीका त्यांनी अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केली होती. आमच्या आईवर वार करणाऱ्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. दसऱ्यात लक्तरे काढणारच. कमळाबाईचा व मुंबईचा काय संबंध आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी कालच्या मेळाव्यात विचारला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!