Share

Gautam Adani | गौतम अदानी यांचं नाव श्रीमंताच्या यादीतून घसरलं, ‘या’ क्रमांकावर आले अदानी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंतांची यादी मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या गौतम अदानी यांना झटका बसला आहे. श्रीमंतांच्या नवीन यादीमध्ये अदानींच्या स्थानामध्ये घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्समध्ये मात्र त्यांनी दुसऱ्या क्रमांकावरचं स्थान कायम ठेवलं आहे.

ब्लूमबर्ग आणि फोर्ब्स या दोन्हींच्या रँकिंगमध्ये गौतम अदानी दुसऱ्या क्रमांवर होते. पण फोर्ब्स रिअल टाईम बिलेनिअर इंडेक्समध्ये त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावलं आहे. बर्नार्ड अर्नाल्टने पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. फेड रिझर्वच्या निर्णयानंतर बुधवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पहायला मिळाली आहे.

टेस्ला, गूगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांच्या गुंतवणूकीतयूएस मार्केटमध्ये झालेल्या घसरणीमुळे मोठ नुकसान झालं आहे. यामुळे स्थानिक बाजारात झालेल्या घसरणीचा फटका अरबपतींच्या संपत्तीवर देखील झाला. अशातच अदानींनी एका दिवसात 4.7 अरब

डॉलरची संपत्ती गमावली. फोर्ब्स रिअल टाइम बिलेनियर इंडेक्समध्ये गौतम अदानी टॉप लूजरपैकी एक ठरले.
दरम्यान, तब्बल 5.9 अरब डॉलरची संपत्ती गौतम अदानी यांनी गमावल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरुन तीसऱ्या क्रमांकावर आले आहेत. यानंतर त्यांची संपत्ती 153.6 अरब डॉलर शिल्लक राहीली आहे. तसेच, बर्नार्ड अर्नाल्टच्या संपत्तीमध्ये 2.3 अरब डॉलरने वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!