Share

Ramdas Kadam | रामदास कदमांनी रश्मी ठाकरेंबद्दल केलेलं ‘ते’ विधान घेतलं मागे म्हणाले…

Published On: 

मुंबई : शिंदे गटाने काही दिवसांपूर्वी कोकणामधील रत्नागिरीत पहिला मेळावा घेतला होता. त्यावेळी  दापोली येथील सभेत बोलताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेतील नेते आक्रमक झाले होते. याच पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी रश्मी ठाकरेंवर केलेलं विधान मागे घेतलं असल्याचं समजतं आहे.

काय म्हणाले रामदास कदम ?

रश्मी ठाकरेंविरोधातील विधान अनावधानाने केलं असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं. रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, एक गोष्ट मी बोलायला नको होती, ती म्हणजे रश्मी वहिनी स्टेजवर कशासाठी. हे माझ्याकडून बोलून गेलं हे मान्य.हे बोलण्याची आवश्यकता नव्हती.

पुढे रामदास कदम असंही म्हणाले, रश्मी ठाकरे उद्धवजींच्या पत्नी आहेत. अनेक मुख्यमंत्र्यांच्या पत्नी स्टेजवर येतात. त्याबाबतचं वाक्य मी मागे घेतो. मला काही अडचण नाही त्याची. ते अनावधानाने माझ्याकडून बोलून गेलं आहे

रश्मी ठाकरेंवर केलेलं वक्तव्य-

दरम्यान, माँसाहेब कधी कोणत्या कार्यक्रमात गेल्या नाहीत, व्यासपीठावर चढल्या नाहीत. परंतू आमच्या रश्मी वहिनी मंत्रिमंडळात कशा नाही आल्या याचं आश्चर्य वाटतं. कुठेही गेल्या तरी त्या सोबत हव्यातच, असं वक्तव्य रामदास कदम यांनी रश्मी ठाकरेंविरोधात केलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!