मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतील गोरेगावातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात भाषण करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांचा टीकेचा रोख हा एकनाथ शिंदे आणि भाजपावर दिसून आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले की, फडणवीस ही तुमच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील पहिली निवडणूक आहे, असं लढणार आहोत. याच वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
उद्धव ठाकरे यांचं कालचं भाषण निराशेचं होतं. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है, जो तकदीर में लिखा होता है, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केला आरोप-
पुढे बोलताना फडणवीस सांगितले, 2019ला महाविकास आघाडी सरकारने मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते तेव्हाही मला ते संपवू शकले नाहीत आणि आता पुढेही संपवू शकणार नाहीत.
आमच्या पाठीत खंजीर खुपसला –
तसेच, यांनी 2019 ला मोदींचा फोटो दाखवून हे निवडून आले. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत आघाडी केली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला. मग त्यावेळी त्यांनी का राजीनामा देऊन परत निवडणूक घेतली नाही?, असा सवालही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sandeep Deshpande | “आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती, उद्या…”; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला
- Atul Bhatkhalkar | उद्धव ठाकरे शिवजयंती विसरले अन् अतुल भातखळकर म्हणाले…
- BYD ATTO 3 Launch Date | ‘या’ दिवशी लॉंच होणार BYD ATTO 3 इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या!
- keshav upadhye | “पेंग्विन सेनाप्रमुखांना गिधाड आणि गरूड यांच्यातला फरक कळत नाहीय”
- Jayant Dubale | कौतुक करावं तितकं कमी! नागपूरच्या जयंत दुबळेने इंग्लंड येथील नॉर्थ चॅनेल पोहून केला नवा विक्रम


