Share

Devendra Fadnavis | “2019 ला मोदींच्या फोटोवर निवडून आले आणि नंतर…”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

Published On: 

मुंबई : काल शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भाषण करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला आव्हान दिले की, हिंमत असेल तर एका महिन्यामध्ये निवडणूका घ्या. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

2019 ला मोदींचा फोटो दाखवून हे निवडून आले. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत आघाडी केली, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संंवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

आमच्या पाठीत खंजीर खुपसला-

आमच्या पाठीत खंजीर खुपसला. मग त्यावेळी त्यांनी का राजीनामा देऊन परत निवडणूक घेतली नाही? असा खोचक सवालही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना केला आहे. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, 2019ला महाविकास आघाडी सरकारने मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते तेव्हाही मला ते संपवू शकले नाहीत आणि आता पुढेही संपवू शकणार नाहीत.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, तुमच्यात जर हिंमत होती, तर काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षासोबत जावून निवडणूक लढवायची होती. मग जिंकून यायचं होतं. उद्धव ठाकरेंचं कालंच भाषण हे पूर्णपणे निराशेचं भाषण होतं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!