महाराष्ट्र देशा डेस्क: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींच्या यादीत समावेश आहे. दीपिका पदुकोण 2006 पासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत तीच फॅन फॉलोईंग आहे. तिच्याकडे पैसे, सुख-संपत्ती आणि प्रसिद्धी सगळं काही आहे. ती सध्या एकाच वेळी अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान, एका कार्यक्रमादरम्यान दीपिकाने तिच्या नैराश्याच्या (डिप्रेशन) दिवसांबद्दल सांगितले. ती म्हणाली, एक वेळ आली होती जेव्हा मी आत्महत्येचा विचार करू लागले होते. मग माझ्या आईने माझे दुःख समजून घेतले आणि त्यावर मात करण्यास मदत केली.
दीपिकाने सांगितले की, “त्या दिवसात मला फक्त झोपायचे होते. माझ्याकडे उठण्यासाठी कारणच नव्हते. झोपणे हा माझा लपण्याचा आणि नैराश्य विसरण्याचा मार्ग होता. त्यावेळी माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे, त्या विचारांबरोबर मला खूप संघर्ष करावा लागला. माझे आई-वडील बंगळुरूमध्ये राहतात आणि जेव्हा ते मला भेटायला यायचे तेव्हा मी नेहमीच स्वत:ला खंबीर दाखवत असे. आई-वडील काही दिवस माझ्यासोबत राहिले. सर्व काही ठीक चालले होते पण एके दिवशी माझे आई-वडील परत जात असताना मी त्यांच्यासमोर अचानक रडू लागले. मी पूर्णपणे खचून गेले होते.”
आईची साथ
दीपिका पुढे म्हणाली की, “माझी अवस्था पाहून माझ्या आईने मला खूप प्रश्न विचारले. तुझी ही अवस्था बॉयफ्रेंडमुळे झाली आहे का? की कोणत्या कामामुळे? नक्की काय झालंय? पण काही वेळाने तिला समजलं की मी डिप्रेशनमध्ये आहे. त्यांनतर तिने मला खूप साथ दिली. मी माझ्या आई आणि कुटुंबामुळेच या परिस्थितीतून बाहेर आले आहे. म्हणूनच याचं सर्व श्रेय मी माझ्या आईला देते.”
आगामी चित्रपट
येत्या काळात दीपिका प्रभाससोबत ‘प्रोजेक्ट के’ मध्ये काम करत आहे. याशिवाय ती हृतिक रोशनसोबत ‘फाइटर’ आणि अमिताभ बच्चनसोबत ‘द इंटर्न’च्या रिमेकमध्येही दिसणार आहे. यासोबतच ती सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’मध्येही दिसणार आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत शाहरुख खान आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Bhandara | महाराष्ट्र हादरला; महिलेवर सामूहिक बलात्कार, रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात अन् विवस्त्र आढळली
- Corona | सण समारंभाच्या काळात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
- CWG 2022 : मराठवाड्याच्या ARMY मॅनची ऐतिहासिक कामगिरी! स्टीपलचेस शर्यतीत रौप्य पदकाची कमाई
- Eknath Shinde । स्वतःचा शिवसेना तर शिवसेनेचा उल्लेख ‘उद्धव ठाकरे’ गट; शिंदेंचं ट्विट चर्चेत
- 75th Independence Day | भारताच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पहिल्यांदाच सहभागी होणार ‘ही’ अमेरिकन गायिका


