Share

Corona | सण समारंभाच्या काळात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Published On: 

महाराष्ट्र देशा डेस्क: कोरोनाचं संकट आता कुठे कमी झालं असल्यासारखं वाटतं असतानाच कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना वाढणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र असल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २०२४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर पाच रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. यासह सध्या राज्यातील बाधितांची संख्या 80,55,989 झाली असून मृतांची संख्या 1,48,129 इतकी झाली आहे. त्यामुळे सध्या जरा बिनधास्त झालेल्या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज भासत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 19,406 नवीन रुग्ण आढळले असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान 19,928 रुग्ण बरे झाले आहेत. या अहवालानुसार, देशातील कोरोनाचा दैनंदिन संसर्ग दर ४.९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1,34,793 वर पोहोचली आहे. याशिवाय देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,26,649 इतकी झाली आहे. राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे 2,419 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण 12.95 टक्क्यांवर पोहोचले.

देशातील सहा राज्यांमध्ये वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे केंद्रासह राज्य सरकारची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला ब्रेक लावण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिवांनी पुन्हा एकदा दिल्ली, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहून सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. या सर्व राज्यांना लसीकरणाला गती देण्यास आणि कोविडच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. यातच आता सण समारंभाचे दिवस सुरू झाले आहेत. गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी या काळात जर नागरिकांनी खबरदारी घेतली नाही तर पुन्हा कोरोनाचे संकट बळावू शकते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!