🕒 1 min read
Bhandara | भंडारा : राज्यात सध्या एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि भयंकर अशी घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याचं वृत्त आहे. इतकेच नाही तर या आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्यावर या पीडितेला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले आणि घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, अमानुष पद्धतीने झालेल्या अत्याचारामुळे पीडितेची प्रकृती बिकट असून नागपुरात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ तपासासाठी आपल्या टीम तयार केल्या आणि आरोपींचा शोध सुरू केला. सध्या या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी आरोपींचा शोध सुरू असून, गोंदिया पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर भंडाऱ्यात तळ ठोकला. सध्या नागपूर रुग्णालयात रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली असून आणखी शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती आहे.
30 जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान 35 वर्षीय महिलेवर कनहाडमोह गावाजवळ वेगवेगळ्या आरोपींनी सामूहिक बलात्कार केले होते. त्यानंतर ती गावकऱ्यांना गंभीर अवस्थेत महामार्गाच्या शेजारी आढळली होती. सुरुवातीला तिला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची गंभीर अवस्था लक्षात घेत तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथेही तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Corona | सण समारंभाच्या काळात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
- CWG 2022 : मराठवाड्याच्या ARMY मॅनची ऐतिहासिक कामगिरी! स्टीपलचेस शर्यतीत रौप्य पदकाची कमाई
- Eknath Shinde । स्वतःचा शिवसेना तर शिवसेनेचा उल्लेख ‘उद्धव ठाकरे’ गट; शिंदेंचं ट्विट चर्चेत
- 75th Independence Day | भारताच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पहिल्यांदाच सहभागी होणार ‘ही’ अमेरिकन गायिका
- Sunil Raut । मोठी बातमी : पत्राचाळ प्रकरणात भाजपच्या मोहित कंबोज यांचा समावेश; सुनील राऊतांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
