नागपूर : महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज नागपुर दौऱ्यावरती आहेत. आज ते अनेक हॉस्पिटलमध्ये जाऊन बैठक घेणार आहेत. तसेच अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात पुरेशा निधी उपलब्ध होत आहे आणि रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल यांना निधी मंजूर होत नाही.
यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, त्यांचा मतदारसंघात विकास झाला पाहिजे, हे महाविकास आघाडी सरकारची जवाबदारी आहे. यासह राजेश टोपेंनी संभाजी राजे यांच्या उमेदवारीवरही आपले मत स्पष्ट केले आहे. राजेश टोपे म्हणाले, राज्यसभेची उमेदवारी कोणाला द्यायची हे सर्व पक्षश्रेष्ठी वर अवलंबून आहे. त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

