Share

संजय राऊतांविरोधात सोमय्या दाम्पत्याकडून १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल!

Published On: 

मुंबई :  मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष अधिकाधिक वाढत जाताना दिसत आहे. खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या वारंवार टीका करताना दिसून येत आहेत. यांच्यात घोटाळे उघड करण्यावरून संघर्ष होताना दिसत आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी आज संजय राऊतांविरोधात उच्च न्यायालयात १०० कोटीचा ब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. संजय राऊतांविरोधात सोमय्या दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे.

किरीट सोमय्या यांनी आता दावा दाखल केल्यानंतर यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “१०० कोटींचा शौचालय घोटाळा काय असतो हे आता मुख्यमंत्री ठाकरेंना समजेल,” असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. आता संजय राऊत हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे प्रवक्ते असून, त्यांनी माफी कशी मागावी याची तयार करून ठेवावी, असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला. सोमय्या दाम्पत्याकडून संजय राऊत यांच्यावर १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. आता संजय राउतांना किती शिक्षा होणार हे न्यायालय ठरवणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेला केवळ उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची माफी हवी आहे. त्यांनी माफीयागिरी करुन अनेक भ्रष्टाचार केले आहेत. एका नेव्ही ऑफीसरला मारहाण, मनसूख हिरेनची हत्या, हिरामणीचे त्याच्या परिवारासमोर मुंडण करणे, अशी दादागिरी त्यांच्या गुडांनी केली आहे. लोकांना धमक्या देणे, जीवेमारण्याचं काम करणे या सगळ्यामुळं एकदा तरी यांना धडा शिकवायचा होता, आता न्यायालया योग्य तो निर्णय घेईल असेही किरीट सोमय्या म्हणाले आहेत. याबाबत याचिका वकीलांनी न्यायालयात दाखल केली असून जून महिण्यात यावर सुनावणी सुरु होईल, असंही सोमय्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!