Share

‘या’ कारणामुळे बबिता जी सोडणार ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ टीव्हीवरील ही खूप प्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेचे चाहते जगभरात आहेत. या मालिकेमधील पात्रांना लोक भरभरून प्रेम देतात. या मालिकेसंदर्भात चाहत्यांना सतत वाईट बातम्या ऐकायला मिळत आहेत. आधी दयाबेन नंतर शैलेश लोढा आणि आता मालिकेमधील आणखी एक महत्वाचं पात्र साकारणारी अभिनेत्री ही मालिका सोडून जाण्याची बातमी समोर येत आहे. ती दुसरी कोणी नसून बबिता जीची भूमिका करणारी मुनमुन दत्ता आहे.

माहितीनुसार, मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला लवकरच अलविदा म्हणू शकते. मुनमुन दत्ता हिला ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सीझनसाठी संपर्क साधण्यात आला आहे. जर ती यामध्ये जाण्यास तयार झाली तर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडू शकते. पण मुनमुन दत्ताने मालिका सोडल्याचे कोणतेही विधान केलेले नाही.

चाहत्यांसाठी मजेशीर बाब आहे. जर अभिनेत्री ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये गेली तर तिला रिअॅलिटी शोमध्ये पाहणे चाहत्यांसाठी खूप वेगळा अनुभव असेल. अभिनेत्री ‘बिग बॉस 15’ मध्ये पाहुणी म्हणून घरात गेली होती. यावेळी या अभिनेत्रीचे खूप कौतुक झाले होते. अशा परिस्थितीत जर मुनमुन या शोचा भाग बनली तर हा शो धमाका करणार.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमधील चाहत्यांना धक्का बसणार. एकीकडे मुनमुन दत्ताला ओटीटीमध्ये पाहून चाहते आनंदी होतील, तर दुसरीकडे ‘तारक मेहता’ मालिकेच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल. या मालिकेमध्ये बाबीताजी ची भूमिका साकारून मुनमुन दत्ता चांगलीच प्रसिद्ध झाली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!