Share

Women’s T20 Challenge 2022 : स्मृती विरुद्ध हरमनप्रीत..! आजपासून रंगणार महिलांची आयपीएल; वाचा पहिल्या मॅचबाबत सर्वकाही!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज सोमवारपासून महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा (Women’s T20 Challenge 2022) सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात ट्रेलब्लेझर्स संघ सुपरनोव्हासशी भिडणार आहे. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. साखळी टप्प्यातील तीन सामन्यांमध्ये एकूण तीन संघ सहभागी होतील. अव्वल दोन संघ २८ मे रोजी अंतिम फेरीत खेळतील. स्मृती मंधाना ही महिला टी-२० चॅलेंज २०२२मध्ये ट्रेलब्लेझर्सची कर्णधार आहे, तर हरमनप्रीत कौर सुपरनोव्हास संघाचे नेतृत्व करत आहे. बीसीसीआयने गेल्या आठवड्यात या लीगबाबत माहिती दिली होती. या लीगमध्ये तीन संघ आहेत.

सामन्यापूर्वी गतविजेत्या ट्रेलब्लेझर्सची कर्णधार स्मृती मानधना म्हणाली, ”यावर्षी संघाला भरपूर टी-२० सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत महिला टी-२० मध्ये अधिक चांगली कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असेल.” सुपरनोव्हासची कर्णधार हरमनप्रीत म्हणाली, ”ही लीग गोलंदाज मानशी जोशीसाठी चांगले व्यासपीठ ठरू शकते.” पंजाबची २८ वर्षीय गोलंदाज जोशी कोरोनामुळे शेवटची स्पर्धा खेळू शकली नाही.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

ट्रेलब्लेझर्स : स्मृती मंधाना (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, शर्मीन अख्तर, हेली मॅथ्यूज, रिचा घोष (यष्टीरक्षक), सलमा खातून, सुजाता मलिक, पूनम यादव, रेणुका सिंग, प्रियांका प्रियदर्शनी, राजेश्वरी गायकवाड.

सुपरनोव्हास : डिआंड्रा डॉटिन, प्रिया पुनिया, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया (डब्ल्यूके), सने लुस, पूजा वस्त्राकर, सोफी एक्लेस्टोन, अलाना किंग, मेघना सिंग, मानशी जोशी.

स्पर्धेचे वेळापत्रक

  • पहिला सामना : २३ मे, संध्याकाळी ७:३० – ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोव्हास
  • दुसरा सामना : २४ मे, दुपारी ३.३० वाजता – सुपरनोव्हास विरुद्ध वेलोसिटी
  • तिसरा सामना : २६ मे, संध्याकाळी ७:३० – वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स
  • अंतिम सामना : २८ मे, संध्याकाळी ७:३० वाजता

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!