मुंबई : नोरा फतेही सध्या डान्स दिवाने ज्युनियर हा शो जज करत आहे. हा एक रिअॅलिटी शो आहे ज्यामध्ये लहान मुलं आपली डान्स टॅलेंट दाखवत आहेत. आता नोरा फतेहीने शोच्या सेटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती सेटवर मिताली राजकडून क्रिकेट शिकताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
नोरा फतेहीने शेअर केलेला व्हिडिओ डान्स दिवानेच्या सेटवरील आहे, ज्यामध्ये ती साडी नेसून क्रिकेट खेळताना दिसत आहे. मिताली राज तिला क्रिकेटच्या ट्रिक्स शिकवत असल्याचे दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CftDochAJQF/
नोरा फतेही अनेकदा डान्स दिवाने ज्युनियरच्या सेटवरून तिचे मजेदार व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये नोरा फतेही ती गर्भवती नसल्याचे सांगत आहे. तो व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :


