मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांमी माफिया, असा उल्लेख केला. त्यामुळे राजकारण चांगलेच पेटले आहे. शिवसेनेचे आमदार जरी बंड करत भाजपसोबत गेले असले तरी ते शिवसेनेत असल्याचे सांगत आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असल्याचे सांगत आहेत. मात्र युती असलेल्या भाजप नेत्याकडून होत असलेली टीका आता शिवसेना आमदारांच्या जिव्हारी लागली आहे.
“मंत्रालयात आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हाठविल्या बदल अभिनंदन केले”, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले होते. यावर दीपक केसरकर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. किरीट सोमय्या उद्धवजींबाबत जे बोलले ते चुकीचे असल्याचे केसरकर म्हणाले.
याबाबत केसरकर यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितले आहे. फडणवीस याबाबत निर्णय घेतील आणि यापुढे उद्धव ठाकरेंवर टीका होणार नाही असे केसरकरांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा झटका देत सत्तेवर विराजमान झाले. एकून ५० आमदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठींबा आहे. बंडखोर आमदार आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना, असा सामना सध्या राज्यात रंगला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तापरिवर्तन झाले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक समीकरणे बदलली आहेत.
महत्वाच्या बातम्या :


