Share

जाळ अन् धुर संगटच..! दिग्दर्शक नागराज मंजुळे झाले डॉक्टर; वाचा सविस्तर!

Published On: 

मुंबई : पिस्तुल्या, फॅंड्री, सैराट आणि आता झुंड असे एक एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट देऊन प्रेक्षक आणि रसिकांच्या मनात घर करणाऱ्या नागराज मंजूळे यांचा डी वाय पाटील विद्यापीठाकडून मोठा सन्मान करण्यात आला आहे. डी. वाय.पाटील विद्यापीठाने नागराज मंजुळे यांना सन्मानाची डॉक्टरेट ही पदवी दिली आहे. नागराज मंजुळे यांनी चित्रपट क्षेत्रात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय त्यांच्या या विविध योगदानाबद्दल त्यांचा सन्मान केल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

प्रा. हनुमंत लोखंडे यांनी नागराज मंजुळे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाे डी.लीट बहाल केल्याची माहिती दिली. नागराज मंजुळे यांचे डॉक्टरेट पदवी स्वीकारतानाचे फोटो शेअर करत प्रा. लोखंडे यांनी म्हटले की, संघर्षाच्या काळात आपण एम.फिल किंवा SET/NET व्हावे अशी आपली इच्छा होती. त्यासाठी आपण पुणे विद्यापीठात चकरा मारतानाचे दिवस आजही मला आठवतात. आपण इयत्ता 10 सोडल्यापासूनचा ते ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. याचा साक्षीदार होणे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे.

‌चित्रपट क्षेत्रात पदार्पण केल्यापासूनच नागराज मंजुळे यांनी वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविण्यावर भर दिला. पिस्तुल्या फॅंड्री सैराट आणि आता झुंड असे त्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. सैराट हा मराठी भाषेत निर्मिती झालेला प्रादेशिक चित्रपट असूनही या चित्रपटाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा धंदा केला.

महत्वाच्या बातम्या :

“तुमचा जो महाराष्ट्रद्रोही आत्मा आहे, तो शांत करा” , राऊतांचा फडणवीसांना सल्ला

CSK vs KKR : कधी, कुठे, केव्हा पाहता येणार IPL 2022चा पहिला सामना? वाचा एका क्लिकवर!

यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

माढ्यात गाईने दिला एकाच वेळी दोन वासरांना जन्म!

‘शरीरात चुकीचं औषध टाकून मला संपवण्याचा होता डाव’, नितेश राणेंचा गंभीर आरोप

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!