Share

“काश्मिरी पंडितांसोबत शिखांनी सुद्धा बलिदान दिले”, संजय राऊतांचा मोठा दावा 

Published On: 

 मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बहुचर्चित असलेला ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून भाजपला निशाण्यावर धरले आहे. या चित्रपटाबाबत राजकीय क्षेत्रात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट बघून याचे कौतुक केले आहे. मात्र काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून या चित्रपटात असत्यता दाखवली असल्याचा आरोप सतत केला जात आहे. आता यावरच संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया देत मोठा दावा केला आहे.

काश्मीर हा आपल्या देशासाठी आणि देशाच्या जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असा विषय आहे. अनेक वर्ष देशात राजकारण सुरू आहे, आम्हाला वाटले होते की नरेंद्र मोदी आल्यानंतर ते थांबेल, पण ते वाढतच चालले आहे. कश्मीर फाइल्स मध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या असत्य आहेत, ज्या घडलेल्या नाहीत. पण तो चित्रपट आहे, ज्यांना पाहायचा आहे ते पाहतील आणि ज्यांना खटकलं असेल ते बोलतील. तेवढे स्वातंत्र्य आपल्या देशात आहे. पण काश्मिरी पंडितांसोबत शिखांनी सुद्धा बलिदान दिले आहे. सुरक्षा दलातील मुस्लिम पोलिसांना देखील अतिरेक्यांनी मारले आहे. कश्मिरी पंडितही सांगतात की त्यांचे प्राण वाचवायला अनेकवेळा मुस्लिम अधिकारी आले होते. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच या चित्रपटाला आता एखादा पुरस्कार देण्यात येईल. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पद्मश्री किंवा पद्मभूषण पुरस्कार देण्यात येईल. ज्या पद्धतीने देशात राजकारण सुरु आहे त्यामध्ये हे  होणारच आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून काश्मीरमध्ये हिंदू पंडितांना अत्याचाराला सामोरे जावे लागले. आतापर्यंत त्यांची घरवापसी झालेली नाही याचे आम्हाला दुःख आहे. काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचे वचन भाजपाने आणि पंतप्रधान मोदींनी दिले होते. ते आतापर्यंत पूर्ण का नाही झाले? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!