🕒 1 min read
मुंबई: देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ (Kashmir Files Movie) या चित्रपटवरून राजकारण चांगलेच पेटले असल्याचे दिसून येत आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष रंगताना दिसून येत आहे. यावर अनेक राजकीय प्र्तिक्रिया देखील उमटत आहेत. आता यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
अनेक चित्रपट येतात आणि त्यामध्ये कधी खोट्या कथाही दाखवल्या जातात. लोक ते पाहून विसरुन जातात. एका निर्मात्याने चित्रपट तयार केला आणि त्यात अनेकांनी काम केले. काश्मीरमध्ये अनेक वर्षांपासून काय झाले आहे ते आम्ही जवळून पाहिले आहे. त्यावर चित्रपट तयार करण्यात आला असून त्याचा राजकीय फायद्यासाठी लोक प्रयत्न करतील पण तो होणार नाही. पण त्यामध्ये सत्य लपवण्यात आले आहे आणि ते चित्रपटामध्ये यायला हवे होते. ‘द कश्मीर फाइल्स’चा भाजपा आणि पंतप्रधान प्रचार करत आहे. त्यामुळे भाजप समर्थक हा चित्रपट पाहणारच. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच या चित्रपटाला आता एखादा पुरस्कार देण्यात येईल. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पद्मश्री किंवा पद्मभूषण पुरस्कार देण्यात येईल. ज्या पद्धतीने देशात राजकारण सुरु आहे त्यामध्ये हे होणारच आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून काश्मीरमध्ये हिंदू पंडितांना अत्याचाराला सामोरे जावे लागले. आतापर्यंत त्यांची घरवापसी झालेली नाही याचे आम्हाला दुःख आहे. काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचे वचन भाजपाने आणि पंतप्रधान मोदींनी दिले होते. ते आतापर्यंत पूर्ण का नाही झाले? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
