मुंबई : बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी हीचा सोशल मीडियावर चाहतावर्गही फार मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून सनीला ट्रोल केले जात आहे . सनीनं काही मुलांचे पालकत्व घेतले आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आपण पूर्वआयुष्यात काय केले यावरुन नेहमी लोकं नाव ठेवतात. तो माझ्या कामाचा भाग होता. आता आपण ते काम सोडून दिले असून जेव्हा नव्यानं आयुष्य सुरु करतो तेव्हाही काहीजणं जाणीवपूर्वक भुतकाळातील आठवणीत रमतात. हे पाहून वाईट वाटत असल्याची भावना सनीनं यावेळी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर सनीनं तिच्या कुटूंबासमवेतचा एक फोटो शेयर केला होता. त्यावरुन तिला आता ट्रोल केले जात आहे. सनीनं सांगितलं आहे की, मी एक चांगली आई आहे आणि ते मला कुणाला समजावून सांगण्याची गरज नाही. दरवेळी मी माझ्या कुटूंबासमवेत जे फोटो शेयर करते त्याला नावं ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. जेणे कुणी नावं ठेवत असतील त्यांना मला सांगायचे आहे की, आपण जे करता आहात ते चुकीचे आहे. नेटकरी तिच्या निशा नावाच्या मुलीला सातत्यानं ट्रोल करताना दिसतात. त्यावरुन सनी चिडली आहे. निशाला सनीनं दत्तक घेतलं आहे. नेटकऱ्यांनी सनी आणि तिचा पती डॅनियल वेबरचा फोटो सोशल मी़डियावर पोस्ट केला होता.
त्या फोटोवरुन सनी म्हणते, सोशल मीडियावर माझ्याविषयी काय लिहिले जाते याचा मला काहीही फरक पडत नाही. मात्र दरवेळी माझ्या कुटूंबाविषयी बोलले जाते त्याचा त्रास होतो. आम्ही आमच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफविषयी गंभीरपणे विचार करतो. त्यामुळे नेटकऱ्यांनी उगाचच ट्रोल करण्याचा प्रयत्न करु नये. असे आवाहनही केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
