मुंबई : औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या सगळ्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या ८ जूनला औरंगाबादेत सभा घेणार आहेत. कोरोना संकटाच्या दोन वर्षांनंतर प्रथमच औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. तसेच १० जूनला राज्यसभेसाठी निवडणूक देखील आहे. त्यामुळे त्यामुळे सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर जोरदार टीका केली आहे.
“औरंगाबादला काय आमदार विकत घ्यायला चाललेत का? ही काय अवस्था झालीये शिवसेनेची? सरकारकडून जनतेचा जो पैसा वसुली द्वारे आला, त्याचा उपयोग स्वत:च्याच आमदारांना विकत घेण्यासाठी माफिया सेना करतेय”, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
शिवसेनेचा सभेसंदर्भात चौथा टीझर रिलीज
तसेच शिवसेनेने सभेसंदर्भात चौथा टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेतील भाषण आणि व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आजही औरंगाबादच्या नामांतराचा राजकीय संघर्ष सुरू आहे. 1980 च्या दशकात महाराष्ट्रात झपाट्याने उदयास येत असलेल्या शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी सांस्कृतिक मंडळ मैदानावर विजयी सभेला संबोधित करताना संभाजीनगरची घोषणा केली. बाळासाहेबांच्या सभेनंतर शिवसैनिक औरंगाबादला संभाजीनगर म्हणू लागले. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी पक्षाने टीझर शेअर करत बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण शेअर केले आहे. ज्यात ते औरंगाबाद हे संभाजीनगर असल्याचे सांगत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


