Share

कोरोनाचा विस्फोट! अत्यंत गरज असेल तरच आरोपीला अटक करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी निर्देश दिले. शनिवारी सर्व राज्यांच्या पोलिसांना कोर्टाने निर्देश दिले की, जोपर्यंत गरज नसेल तोपर्यंत आरोपीला अटक करू नये. कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी हे निर्देश दिले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, आमच्या आधीच्या आदेशानुसार ज्या कैद्यांना पॅरोल देण्यात आली आहे, त्यांना पुन्हा ९० दिवसांची फर्लो द्यावा. यात उशीर करू नये.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘गेल्यावर्षीच्या निर्देशाचे राज्याने पालन करावे. ज्या कैद्यांना गेल्या वर्षी सोडले होते, त्यांची पुन्हा सुटका करावी. ज्यांना पेरोल मिळाले होते, त्यांना ९० दिवसांसाठी सोडावे. तसेच महत्त्वाच्या प्रकरणासंबंधितच अटक केली पाहिजे.’ सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी नियुक्त केलेल्या समितीला सांगितले की, ‘सशर्त सुटण्यास पात्र असलेल्या नव्या कैद्यांनाही त्यांच्या सुटकेसाठीच्या विचारात घ्यावे.’

यापूर्वी देशातील सर्वात मोठे तुरूंग तिहार जेलमधील कैद्यांना पेरोलवर सोडण्याची तयारी झाली आहे. शुक्रवारी कोरोना केसेस वाढल्यामुळे तिहार जेल प्रशासनाने जवळपास ४ हजार कैद्यांना पेरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला. या कैद्यांना ९० दिवसांच्या जामीनावर सोडले जाईल. तिहार जेलमध्ये १० हजार २६ कैद्यांची क्षमता आहे, परंतु सध्या १९ हजार ६७८ कैदी बंद आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३०० पेक्षा जास्त कैदी आणि शंभरपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीये. शिवाय गेल्या आठवड्यात ५ कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!