Share

गरम पाणी प्यायल्याने कोरोना विषाणूपासून बचाव होत नाही; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Published On: 

मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

देशात कोरोनाचा थैमान सुरु आहे. भारतात शुक्रवारी ४ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यासह संपूर्ण देश आज कोरोना संकटाच्या या भयावह आगीत होरपळतोय. अशा परिस्थितीत काहीजण गरम किंवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला देत आहेत. गरम पाणी पिल्याने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र, गरम पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

केंद्र सरकाच्या MyGovIndia या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ट्विट करण्यात आलं आहे. ‘गरम पाणी प्यायल्यानं किंवा गरम पाण्यानं आंघोळ केल्याने कोरोनापासून बचाव होत नाही. कुठल्याही ऐकवी माहितीवर विश्वास ठेवू नये’, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

याशिवाय पीआयबीच्या फॅक्टचेक टीमनंही याबाबत अधिकृत खुलासा केला आहे. सोशल मीडियात सध्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय आणि औषधांचे सल्ले दिले जात आहेत. पण त्यात काहीच तथ्य नसल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. यात गरम पाणी पिण्याचा सल्ला खूपच व्हायरल झाला आहे. यासोबतच खायच्या पानांचं सेवन करण्याचाही सल्ला देण्यात येत आहे. पण अशाप्रकारचे सल्ले न ऐकण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.

सोशल मीडियावर जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख करुन चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं देखील समोर आलं आहे. भारतातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली असून १० मे पर्यंत देशात ५० हजार मृत्यू होणार असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे, अशी खोटी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या मेसेजवरही केंद्र सरकारच्या फॅक्ट चेक टीमने स्पष्टीकरण दिलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अशाप्रकारची कोणतीही सूचना दिलेली नाही, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!